कोरोना' ची धास्ती कायम रेल्वेकडे प्रवाशांनी फिरविली पाठ

Foto
औरंगाबाद :उन्हाळ्यात दहावी-बारावी परीक्षा आटोपताच शाळा- महाविद्यालयांना सुट्या लागताच अनेकांनी बाहेर गावी जाण्याचा बेत आखला होता. त्यामुळे काहींनी रेल्वेची बुकिंग केली होती. मुबंई, दिल्ली, आग्रा कडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली होती. परंतु 'कोरोना' ची दहशत सर्वत्र पसरल्याने अनेकांनी बाहेर गावी जाणे टाळले आहे. अनेकांनी रेल्वे प्रवासाकडे पाठ फिरवीत प्रवास रद्द केला आहे.

मार्च अखेर दहावी-बारावीची परीक्षा संपताच अनेकजण दरवर्षी तिरुपती, रामेश्वरम, गोवा, दिल्ली, आग्रा, हैद्राबाद, चेन्नई सह आदी ठिकाणी सहलीसाठी जातात. यावर्षीही अनेकांनी मार्च अखेर परीक्षा संपताच बाहेर सहलीसाठी जाण्याचे नियोजन केले होते. त्यानिमित्ताने अनेकांनी चार महिन्यापासून रेल्वे ची ऑनलाईन बुकिंगही केली आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना महिना आगोदर बुकिंग करूनही प्रतीक्षा यादीत राहण्याची वेळ आली होती. परंतु कोरोना आजाराची भीती पसरल्याने अनेक रेल्वेना प्रवासी संख्या कमी झाली आहे. अनेकांनी प्रवास रद्द केला आहे. मुबंई, दिल्ली, हैदराबाद कडे जाणाऱ्या रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. या मार्गे जाणाऱ्या रेल्वेना महिना-महिना वेटिंग प्रवाशांना करावी लागणार असे चित्र काही दिवसांपूर्वी होते. परंतु आता चित्र बदललेले दिसत असून या रेल्वेला गर्दी कमी झाली आहे. कोरोनाच्या धास्तीने अनेकांनी प्रवास करणेच रद्द केले आहे.
मात्र गोवा, कोकण कडे जाणाऱ्या रेल्वेला सर्वाधिक वेटिंग
एकीकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्यात कोरोना आजाराची धास्ती याचा परिणाम मुंबई, दिल्ली कडे जाणाऱ्या रेल्वे खाली खाली झाल्याचे दिसत आहे. परंतु अनेकांनी गोवा, कोकण कडे जाण्याचे नियोजन केले आहे. त्यात कोकण कन्या एक्सप्रेस ला सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे. १९ मार्च पर्यत या रेल्वे ला सर्वाधिक वेटिंग आहे. अनेकांना तिकीट काढूनही तिकीट निश्चित होईल की नाही ? असा प्रश्न पडला आहे. कोकण कन्या एक्सप्रेस ला आजच्या तारखेला ४०० प्रवाशांची वेटिंग आहे. तर उद्या (दि.१५) १८७ प्रवाशांना वेटिंग लिस्टमध्ये राहण्याची वेळ आली आहे. तर १६ मार्च रोजी १८७, १७ मार्च रोजी २०१, १८ मार्च रोजी १५८ तर १९ मार्च रोजी १२० प्रवाशांना तिकीट काढूनही वेटिंग लिस्टमध्ये राहण्याची वेळ आली आहे.